नांदेडसोशल वर्क

Samata Dindi celebrated on the occasion of Social Justice Day : सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यामध्ये आज समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास तर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती भगवान ढगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त व इंजि. इम्राण खान अलईम्राण प्रतिष्ठाणचे सचिव फुले, शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त माधव आंबटवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त संस्था व व्यक्तींना संविधान प्रास्तावीक भेट देण्यात आले.

2 PHOTO Samata Dindi celebrated on the occasion of Social Justice Day : सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

या समता दिंडीत गोदावरी इंटरनॅशनल पब्लीक स्कुल, महात्मा फुले हायस्कुल, शांती निकेतन पब्लीक स्कुल मालेगांव, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल पब्लिक स्कूल , तुकाई नर्सिग स्कुल, मुक्ताई नर्सिग स्कुल, राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, इंदिरा इंटरनॅशनल पब्लीक स्कूल, राणी लक्ष्मी माध्यमिक विद्यालय नांदेड या विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अशोक गोडबोले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, इंजि. इम्राण खान अलईम्राण प्रतिष्ठणचे सचिव फुले, शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त माधव आंबटवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व विद्यार्थी, नागरीक तसेच कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने समता दिंडीत महात्मा फुले यांच्या वेशभुषेत चि. प्रेम दत्त पुंड तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत कु.दिव्या नागनाथ गवाले हया विद्यार्थीनीने सहभाग नोंदवला. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदृनंतर सामुहिक संविधान प्रास्तावीकेचे वाचन करण्यात आले व राष्ट्रगीताने समता दिंडीचा समारोप करण्यात आला.

1 PHOTO Samata Dindi celebrated on the occasion of Social Justice Day : सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

सकाळी 11 वा. समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध विचार पैलु व कार्यावर मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत सामाजिक न्याय, समता बंधुता अधिक सक्षम होण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच बार्टी समता दूत यांनी “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे तर प्रमुख पाहुणे समातादूत प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पाहेरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरिक्षक संजय कदम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!