देगलूर, गंगाधर मठवाले| शहरातील जुने तहसिल कार्यालयात हंगामी न्यायालय चालत असून न्यायालयाची इमारतही पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे हा महसूल विभागाच्या परिसरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विस्तारीत करण्यात येवून संविधान भवन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान व उदयान उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी यूवक कॉग्रेस ( अपा ) चे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.


संबंध बहुजनाचे उद्धारकर्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरातील पूर्णाकृती पुतळा हा रस्त्याच्या कडेला असल्याने दिनविशेष दिवसी याठिकाणी खुप मोठी गर्दी होवुन रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो . शिवाय एरव्ही ही या भागात दुचाकी – चारचाकी व मोठी वाहने यांची वाहतूक नेहमीच असते तर नांगरीकांची वर्दळ नित्याचीच असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व महापरिनिर्वान व इतर सामाजिक उत्थान दिनानिमित् विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम नेहमीच आयोजित करण्यात येतात त्यामुळे ही या मुख्य भागात वाहतूकीची कोंडी होत असते.

शिवाय शहरातील पुरोगामी बहूजनवादी जनतेला सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जागाही नाही. त्यामूळे या शासकिय जागेचा पुतळ्यासाठी विस्तार करण्यात येवून येथे संविधान भवन सांस्कृतिक मैदान, उद्यान निर्माण करावे असे निवेदन देगलूर येथील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष अशोक कांबळे ‘ रमेश घुळेकर, सोमेश कांबळे ‘ सचिन कांबळे , सचिन पोवाडे यांनी केले आ.हे
