Demand : संविधान भवन, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उभारण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना विवेदनाद्वारे मागणी
देगलूर, गंगाधर मठवाले| शहरातील जुने तहसिल कार्यालयात हंगामी न्यायालय चालत असून न्यायालयाची इमारतही पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे हा महसूल विभागाच्या परिसरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विस्तारीत करण्यात येवून संविधान भवन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान व उदयान उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी यूवक कॉग्रेस ( अपा ) चे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
संबंध बहुजनाचे उद्धारकर्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरातील पूर्णाकृती पुतळा हा रस्त्याच्या कडेला असल्याने दिनविशेष दिवसी याठिकाणी खुप मोठी गर्दी होवुन रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो . शिवाय एरव्ही ही या भागात दुचाकी - चारचाकी व मोठी वाहने यांची वाहतूक नेहमीच असते तर नांगरीकांची वर्दळ नित्याचीच असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व महापरिनिर्वान व इतर सामा...
