नांदेड

माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

समनक जनता पार्टीतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर होणारी लूटमार त्वरित थांबवा अशी मागणी माहूर तालुका समनक जनता पार्टी च्या वतीने माहूर तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

सध्या पेरणीचे दिवस चालू आहे. शेतकरी प्रमाणीत दर्जेदार बियाणे योग्य दरात मिळावे यासाठी कृषि सेवा केंद्रात बि-बियाणे व खतांची खरेदी करण्यासाठी जात आहेत परंतु शेतकऱ्याऱ्यांचा निरक्षरपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन सध्या पेरणीच्या मोसमात कृषी दुकानात गर्दी राहत असल्याने व्यापारी प्रमाणीत व दर्जेदार बियाणांची कृत्रिम रित्या तुटवडा दाखवून प्रत्येक बियाण्याच्या पिशवी मागे हजार रूपयांच्या (१०००/-रू.) वर दर लावून बियाणे कसे-बसे देवून शेतकरांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकयांना दर्जेदार, प्रमाणित व हवे ते बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतकरी बांधवाना प्रमाणित बियाण्यासोबत बोगस कंपनीचे बियाणे घेण्यास भाग पाडत आहेत. अन्यथा शेतकरांना टाळाटाळ करून परत पाठवित आहेत. या कृतीमुळे शेतकऱ्याच लूट होवून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

शेतकऱ्यांना प्रमाणीत दर्जेदार खत व वि-बियाणे मिळावे यासाठी प्रशासनामार्फत भरारी पथक नेमल्या जात आहेत परंतु भरारी पथक कानाडोळा करीत असल्यामुळे, संबंधीत कृषि केंद्रांची तपासणी योग्य रित्या करत नसल्या कारणाने व काही दुकानदारावर गुन्हे दाखल होऊन सुध्दा परत- सदरील दुकानदार सर्रास शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे कृषी दुकानदाराचे मनोबल वाढून शेतकऱ्यांची लूट सध्याही सर्रास चालू आहे.

तरी संबंधीत दुकानदारांवर म्हणजेच तुटवडा भासवून चढ्या दराने भाव वाढवून विक्री करणाऱ्या व लूट करणाऱ्या कृषि दुकानदारांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून शेतकऱ्यांची लूट थांबविण्यास सहकार्य करावे व भरारी पथकामार्फत प्रत्येक दुकानदाराची दिवसातून दोन वेळा तपासणी करण्यात यावी व भरारी पथकाची उपस्थिती त्या दुकानावर QR-Code मार्फत करावी अशी मागणी माहूर तालुका समनक जनता पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख अरविंद राठोड,प्रदीप पवार,वसंत राठोड, प्रल्हाद राठोड,गजानन चव्हाण,अजय चव्हाण,विश्वजीत राठोड,राहुल राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!