नांदेडसोशल वर्क

Collector Abhijit Raut : मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड| लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

८७-नांदेड दक्षिणच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते. ८७ नांदेड दक्षिणच्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याचे नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा नांदेड येथे आज प्रथम प्रशिक्षण आयोजित केले होते. मतदान केंद्रावर कार्यरत पोलींग टिमने मतदान सुलभ पध्दतीने घेतल्यास मतदानाची टक्केवारी सुद्धा आपोआपच वाढते. माँक पोल घेतल्यानंतर इव्हिएम मशीन क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व पहिले मतदान अधिकारी असे एकूण 884 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

WhatsApp Image 2024 10 26 at 4.15.32 PM Collector Abhijit Raut : मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

यावेळी सहा. निवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा सांगितली. तहसीलदार प्रविण पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदार, संजय नागमवाड, मुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळे, प्रशिक्षण टिमचे सदस्य संजय भालके, सुनील दाचावार व प्रा. राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून पि.बी.राऊत, एम.जी.कलंबरकर,रायभोळे एम.पी.शिलेदार डि.के. यांनी कार्य केले.

प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जाते, कोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणता, याचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले, याच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसी, पि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य आर.जी.कुलकर्णी यांनी केलें. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार, रुस्तुम आडे,संजय भालके,सुनील दाचावार, राजेश कुलकर्णी, कविता जोशी,सारिका आचमे,हनुमंत राठोड,जमील शेख यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!