हिमायतनगर। शहराचे आराध्य डदैवत श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 30 पासून सुरू करण्यात आलेल्या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, या शिबीरात खुद्द मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ देखील स्वतः उपचार करून घेत असल्याने अनेक वयोवृध्द रुग्ण देखील या उपचार शिबीरात सहभागी झाले आहेत.


गेल्या चार दिवसांपासून विना इंजेक्शन, विना औषध, नैसर्गिक उपचार शिबिर सुरू झाले. सुरूवातीला सदर शिबीरात २०० रूपये नाममात्र प्रवेश फिस घेऊन तब्बल सात दिवस केवळ अर्धा तासात अक्युप्रेशर सह नस दबणणे यासह विविध आजारावर उपचार होत आहेत. चांगला अनुभव आलेले नागरिक इतरांना सांगत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे.


शिबीरात लखवा मारणे, गुडघा दुखी, मान, पाठ, कंबर, अर्धे डोके दुखी, फ्रोजन शोल्डर, साईटिका, स्पोडिलोसिस चमक, लचक मुक्कामार सांधे दुखी, मणक्यामध्ये नस दबणे, स्लिप डिकन्स, हाता पायांना मुंग्या येणे, रक्तपुरवठा व्यवस्थीत करणे, दमा, वजन कमी करणे, तान व तणाव कमी करणे, लहान मुले झोपेत लघवी करणे, पोटाचे सर्व गॅस आजार अक्युप्रेशन थेरेपीने उपचार राजस्थान राज्यातील जोधपूर येथील तज्ञ डॉ. जीतेन्द्र सिंघ, डॉ प्रमोद कुमार, डॉ रजत शर्मा, सौ चंदा शर्मा आदी करीत आहेत. मंदिर समितीच्या पुढाकाराने नाममात्र शुल्कात सात दिवस उपचार होत असल्याने अनेकांनी मंदिर कमिटीच्या सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन केले जाते आहे.




