Acupressure Naturopathy Camp : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास प्रतिसाद -NNL
हिमायतनगर। शहराचे आराध्य डदैवत श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 30 पासून सुरू करण्यात आलेल्या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, या शिबीरात खुद्द मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ देखील स्वतः उपचार करून घेत असल्याने अनेक वयोवृध्द रुग्ण देखील या उपचार शिबीरात सहभागी झाले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून विना इंजेक्शन, विना औषध, नैसर्गिक उपचार शिबिर सुरू झाले. सुरूवातीला सदर शिबीरात २०० रूपये नाममात्र प्रवेश फिस घेऊन तब्बल सात दिवस केवळ अर्धा तासात अक्युप्रेशर सह नस दबणणे यासह विविध आजारावर उपचार होत आहेत. चांगला अनुभव आलेले नागरिक इतरांना सांगत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे.
शिबीरात लखवा मारणे, गुडघा दुखी, मान, पाठ, कंबर, अर्धे डोके दुखी, फ्रोजन शोल्डर, साईटिका, स्पोडिलोसिस चमक, लचक मुक्कामार सांधे दुखी, मणक्यामध्ये नस दबणे, स्लिप डिक...
