नांदेड| अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ.मा.व/वि.जाप्र/शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई भारतजी वानखेडे प्रणित वैद्यकीय शाखेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली असून नुक्तेच एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.


रमेश लोखंडे यांच मागच्या आठरा वर्षांपासून सामान्य कुटुंबातील रुग्ण व आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक तेथे मदत करणे यासाठी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.संघटनेच्या संघटन कार्यातील कामगिरी पहाता भारतजी वानखेडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे यांनी नुकतेच प्रदान केले यावेळी पू.भदंत पय्यांबोधी थेरो सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे, प्रवक्ते सुभाष लोणे ,संजय रत्नपारखे,नंदु मेहकर बबन दवणे शैलेंद्र दवणे सुमेध लोखंडे रत्नदिप लोखंडे अदी संघटनेचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .




