Vasant Kalyankar ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी उत्कृष्ट वसुली साठी सहाय्य करणाऱ्या कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली पोटी मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, यांच्या आदेशानुसार सिडक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जानेवारी महिन्यात एक कोटी रुपयांच्या जवळपास उत्कृष्ट वसुली करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येते, यावेळी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या करनिरीक्षक वसंत कल्याणकर यांना 26 मार्च रोजी मनपाच्या 28 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक संजय नागापूरकर, वरीष्ठ लिपीक नारायण आठवले मारोती सारंग,प्रकाश दर्शने, वसुली लिपीक मालु एनफळे रविंद्र पवळे सुधीर कांबळे नरसिंग कुलकर्णी रमेश यशवंतकर नथुराम चवरे विवेक लोखंडे ऊतम जौधंळे दिपक जौधंळे, कार्यालयीन कर्मचारी मिना अडबलवार, अर्चना जोंधळे, मुक्ता धर्मकेर बालाजी लोहगावकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button