नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!

NNL Team
1 Min Read

नांदेड l दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या भेंडी बाजार घराण्याच्या विख्यात गायिका अनुराधा कुबेर यांच्या स्वरांच्या श्रीमंतीचे दर्शन आज नांदेडकर रसिकांना झाले.या घरंदाज ,चिंतनशील गायिकेच्या गाण्यावर जाणकार रसिक पूरते लुब्ध झाल्याचे पहायला मिळाले.

कोलकत्ता संगीत रिसर्च अकॅडमी येथे शिक्षण घेतलेल्या या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय व सुगम दोन्ही गाणं प्रकारासाठी त्यांनी अविरत परिश्रमाने आवाजाला पैलू पाडलेले आहेत.

प्रारंभी त्यांनी राग ‘बिहाग’ प्रस्तुत केला. संथ आलापीत स्वरांचे गहिरेपण विलक्षण होते. ‘अब हू लालन मैं का’ ‘ या दृत तिनतालात त्यांनी तानांची केलेली बरसात रसिकांना रोमांचित करणारी होती. बागेश्री मधील दोन रचना व ‘ रंग डारूंगी नंदके लालनपे’ ही पारंपारिक होती खावून त्यांनी आपले गायन संपविले मैफलीत तबला संगत भरत कामत यांची तर हार्मोनियम संगत सौमित्र क्षिरसागर यांची होती.सहकलावंत म्हणून ,इंद्रायणी विजय जोशी माधवी मठपती यांनी साथ दिली. कलावंतांचे स्वागत अमिताभाभी चव्हाण आ. सुजयाताई चव्हाण,रत्नाकर अपस्तंभ यांनी केले.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!