Vasant Kalyankar ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी उत्कृष्ट वसुली साठी सहाय्य करणाऱ्या कर निरीक्षक वसंत कल्याणकर यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली पोटी मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, यांच्या आदेशानुसार सिडक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जानेवारी महिन्यात एक कोटी रुपयांच्या जवळपास उत्कृष्ट वसुली करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेण्यात आली.
मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यां...
