क्राईमनांदेड

selling illegal fertilizers without license : हिमायतनगरात विनापरवाना अनधिकृत खत विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर गन्हे दाखल

हिमायतनगर, अनिल मादसवार| विनापरवाना अनधिकृत रित्या तेलंगणा राज्यातील विविध कंपनीचे खत विक्री करणाऱ्या शहरातील एका गोदामावर छापा टाकून वाहनासह खत असे मिळून एकूण 12 लक्ष 59 हजार 472 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हिमायतनगर शहर हे तेलंगणा आणि विदर्भ राज्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे मागल्या अनेक वर्षांपासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात तेलंगणा राज्यातील काही जणांकडून हिमायतनगर येथील कोण्यातरी व्यक्तीला हाताशी धरून शेतकऱ्यांना खताची विक्री करत आहेत. हा प्रकार अनेकदा कृषी विभागाला वर्तमानपत्राच्या बातम्यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न येथिल पत्रकार बांधवानी केला होता. मात्र कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बोटचेपी वृत्तीमूळे अनधिकृत, विनापरवाना खत विक्री करण्याचा गोरखधंदा चालविला जात आहे. यावर्षी देखील खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या पूर्वीचं हिमायतनगर शहरात गोडाऊन घेऊन मोठ्या प्रमाणात खताचा साठा व त्याची विक्री केली जात असल्याची खबर ग्रामीण भागातून ऐकिवात होती. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत गेले, अखेर येथील व्यापारी मंडळींनी या प्रकारची माहिती कृषी विभागाला दिली.

IMG 20250423 220759 selling illegal fertilizers without license : हिमायतनगरात विनापरवाना अनधिकृत खत विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर गन्हे दाखल

त्यावरून हिमायतनगर पंचायत समितीत कार्यरत असलेले गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी गंगाधर दत्तराम भदेवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बुधवारी दिनांक 24 रोजी सायंकाळी 7 वाजता हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे बाजूस सरदार सॉ मिलजवळ पत्र्याच्या टिनशेड मध्ये छापा टाकला. यावेळी खुशी क्रॉप केयर कंपनीचे खत बोलेरो पिकअप क्रमांक MH26 – BE3295 मध्ये विक्री करतांना व साठा करतांना आढळुन आले. या ठिकाणी उपस्थितांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे खत विक्री परवाना उगम प्रमाणपत्र तसेच कंपनीचे जबाबदार व्यक्तीचे नाव व ईतर कागदपत्रे उपलब्ध नव्हते.

तेलंगणा राज्यात निर्मित केलेले 7 लक्ष 59 हजार 472 रुपये किमतीचे खत गोडाऊनमधून अनधिकृतपणे, विनापरवाना 5 लक्ष रुपये किमतीच्या बोलेरो गाडीतून नेले जात होते. यावरून खत उत्पादक कंपनीचे नियंत्रण आदेश 1985 चे उल्लंघन होत असल्याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी गंगाधर दत्तराम भदेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) करूपल्ली व्यंकण्णा वय 42 वर्ष, रा मरली 1-375, चमकोणिबावी, गुराम पोडे मंडल, वटीकोडे, नालागोंडा जिल्हा, तेलंगणा, 2) प्रवीण व्यंकय्या आडेप्पू, वय 22 वर्ष, रा नालागोंडा, 3) मलेश सत्यनारायण बोडला, वय 35 वर्ष रा हैद्राबाद, 4) ख्वाजा नसीर ख्वाजा वजीर वय 42 वर्ष, रा भोकर हल्लीमुक्काम हिमायतनगर या 4 जनांवर खत उत्पादक कंपनीने खत नियंत्रण आदेश 1985 खंड 7, 5, 19,(C)-(|||) clause-8(3) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2) (A), 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांचे सहकारी करत आहेत.

IMG 20250424 094641 selling illegal fertilizers without license : हिमायतनगरात विनापरवाना अनधिकृत खत विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर गन्हे दाखल

तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात विना परवाना अनधिकृतरीत्या खताची विक्री करण्याचे धाडस हे लोक येथील कोणाच्या मदतीशिवाय करणे शक्य नाही त्यामुळे या धंद्यामागे असलेला मुख्य सूत्रधार (आका) कोण..? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत येथील कृषी व्यापारी संघटनेने व्यक्त केले आहे. हा गोरखधंदा चालवुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी या धंद्याला अभय देणाऱ्या आकाचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी वर्गातून केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत हिमायतनगर पोलीस ठाण्यात नांदेडहून आलेले अधिकारी व येथील कृषी व्यापारी तळ ठोकून होते, अन्न भेसळ अधिकारी यांच्या उपस्थितीत तपासणी करून सैम्पल तपासणीला पाठवले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हिमायतनगर पोलिसांनी अनधिकृत खत साठ्याबाबत कार्यवाही केली असून, आत्तापर्यंत तालुकात किती गावात या खताची विक्री केली गेली याचा शोध घेणेही गरजेचे आहे.

अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अनाधिकृत बियाणे व खत विक्रेते गावो-गावी फिरुन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची अमिष दाखवून बियाणे व खते विक्री करु शकतात. असा प्रकार हिमायतनगर येथे उघड झाला असून, आणखी कुठे अश्या प्रकारचे अनाधिकृत बियाणे व खते विक्रेते गावात फिरून विक्री करत असल्यास संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क, साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!