नांदेड/हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकाम पूर्वी प्लॉट वाटपावरून संचालक व व्यापाऱ्यात वादावादी झाली. शाब्दिक चकमक होऊन एकमेकात धक्काबुक्की झाली या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक न्यूज चैनेलला प्रसारित झाल्याने गाळे प्लॉट वाटपाची फेर प्रक्रिया करून यात पारदर्शकता आणली जाईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले आहे.
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी लिलाव पद्धती बिट सुरू करू असे आश्वासन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली. मात्र शेतकऱ्यांच्या विषयी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. तसेच शहरातून मोठया प्रमाणावर भुसार माल मोठया बाजारपेठेत जातो, त्या वाहनांसाठी वसूल करण्यात येणाऱ्या टॅक्स मध्ये घोळ होत असल्याचे बोलले जाते. एव्हढंच नाहीतर शेतकऱ्यांच्या माल खरेदीच्या मोजमाप व इतर बाबतीत अनेक शेतकरी नागरिकांच्या तक्रारी येतच असतात. असे असतानाही हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी साधी बीट पद्धती सुरू करण्यात यश आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घाम गाळून पिकविलेला माल कवडीमोल दराने विकावा लागत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जातो आहे.
बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देण्याचे सोडून केवळ व्यापार हित लक्षात ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीने वरिष्ठाकडून गाळे बांधकामाची मंजुरी आणत दिनांक 15 जून रोजी गाळे बांधकाम करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये प्लॉट वाटपाचे लिलावाद्वारे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 77 गाळे वाटपाचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यासाठी गरजू भुसार व्यापाऱ्यांनी 10 हजार रुपये भरून लिलाव कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सकाळी 11 वाजता गाळे वाटपाच्या लिलाव पद्धतीने सुरुवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी व नागरिकांनीही कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी केली होती.
दुपारपर्यंत गाळे वाटपाची लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती मात्र अंतिम टप्प्यांमध्ये काही गाळे वाटपावेळी जवळच्या काही व्यापाऱ्यांना कमी लिलावाच्या बोलीमध्ये प्लॉट देण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. आज गाळे प्लॉट लिलाव आयोजित करण्यात आला त्याची माहिती बऱ्याच लोकांना देण्यात आली नव्हती. केवळ मोजक्या दोन पेपरमध्ये या लिलाव संदर्भाची जाहिरात छापून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांच्याकडून गाळे प्लॉट वाटपामध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान गाळेवाटपाचा हा प्रकार कोट्यावधी रुपयाच्या घरातला असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भामध्ये संबंधितांशी संपर्क केला असता आमच्या मध्ये वाद झाला पण ते आपसात मिटवल्या गेला असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पण गाळे वाटपाच्या वेळी संचालक व व्यापाऱ्यात वाद सुरू झाला. वाद वाडत जाऊन शाब्दिक चकमक झाली. संचालक व व्यापारी एकमेकांवर धाऊन गेले. त्यांच्यात धक्काबुक्की देखील झाली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. अखेर उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. दरम्यान या प्रकारांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात काहीवेळ तणाव पसरला होता. एकूणच गाळे प्लॉट वाटपाच्या कामात गैरव्यवहार करून मर्जीतील लोकांना गाळे देण्यासाठी हा खटाटोप तर केला गेला नाही ना..? अशी चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
आरोप – प्रत्यारोप
गाळे वाटपाच्या कामात संचालकांनी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. पण संचालकांनी व्यापाऱ्यांचा आरोप फेटाळून लावला. पण गाळे वाटपाच्या वेळी संचालक व व्यापाऱ्यात वाद सुरू झाला. वाद वाडत जाऊन शाब्दिक चकमक झाली. संचालक व व्यापारी एकमेकांवर धाऊन गेले. त्यांच्यात धक्काबुक्की देखील झाली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. अखेर उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. या प्रकारांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात काहीवेळ तणाव पसरला होता त्यानंतर प्रकरण राफाडफा करून सर्वच जण जिकडे तिकडे गेल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शांतता होती.
लिलाव न करता अंधारात गाळे विक्रीचा लिलाव व्हावा. हा काही जणांचा डाव होता. तो संचालक मंडळाने हाणून पाडला. म्हणून काही जण बाजारसमितीची बदनामी करत आहेत. जाहीर लिलावातून हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे जास्तीच्या दरात गेले. यामुळे समितीला अडीच कोटीच्या जागी पाच ते सहा कोटी रुपयांपर्यत उत्पन्न मिळणार आहे. एका व्यापाऱ्याच्या अनधिकृत बांधकामावरून थोडी बोलाबोली झाली. याचा विपर्यास करत काही लोकांनी राईचा पर्वत केला अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव नागोराव माने यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना दिली.