हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे प्लॉट वाटपाच्या लिलावावरुन संचालक व व्यापाऱ्यात राडा -NNL
नांदेड/हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकाम पूर्वी प्लॉट वाटपावरून संचालक व व्यापाऱ्यात वादावादी झाली. शाब्दिक चकमक होऊन एकमेकात धक्काबुक्की झाली या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक न्यूज चैनेलला प्रसारित झाल्याने गाळे प्लॉट वाटपाची फेर प्रक्रिया करून यात पारदर्शकता आणली जाईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले आहे.
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी लिलाव पद्धती बिट सुरू करू असे आश्वासन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली. मात्र शेतकऱ्यांच्या विषयी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. तसेच शहरातून मोठया प्रमाणावर भुसार माल मोठया बाजारपेठेत जातो, त्या वाहनांसाठी वसूल करण्यात येणाऱ...
