नांदेडमहाराष्ट्र

Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा

हिमायतनगर येथे शिवस्मारकासाठी मुन्ना शिंदे यांचे आमरण उपोषण

हदगांव, गौतम वाठोरे | हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवस्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी मुन्ना शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, हिंदवी स्वराज्य या अराजकीय सामाजिक संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये मुन्ना शिंदे यांच्या मागणीला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकासाठी सुरू असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गाने अत्यंत महत्त्वाचे असून, आम्ही या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील हरडफकर यांनी व्यक्त केले.

या पाठिंबा पत्रावर तालुका अध्यक्ष योगेश पाटील खडकीकर, भीमराव मनमदे आणि अमोल शिंदे (धारापूर) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिवस्मारकासाठी जागा मिळविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या उपोषणाला समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने, प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!