Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा
हदगांव, गौतम वाठोरे | हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवस्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी मुन्ना शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, हिंदवी स्वराज्य या अराजकीय सामाजिक संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये मुन्ना शिंदे यांच्या मागणीला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकासाठी सुरू असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गाने अत्यंत महत्त्वाचे असून, आम्ही या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील हरडफकर यांनी व्यक्त केले.
या पाठिंबा पत्रावर तालुका अध्यक्ष योगेश पाटील खडकीकर, भीमराव मनमदे आणि अमोल शिंदे ...
