नविन नांदेड। वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी आय नांदेड यांच्या वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 21 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी निषेध नोंदविला व पंतप्रधान यांच्या कडे निवेदनाद्वारे राजीनामा घेऊन पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.
भारत देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी दि. 17 डिसेंबर 24 रोजी दिल्ली येथील संसद भवनामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत “अभि एक फैशन हो गया है। आंबेडकर आंबेडकर आंबेडकर” इतक नाव देवाचे घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते असे विधान करुन देशातील शोषीत, वंचित, कष्टकरी, कामगार, स्त्री, मोलमजुर, युवक, जेष्ठ यांच्या भावना दुखावल्या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न केद्रिय गृहमन्त्री अमित शाहा यांनी केला. त्यामुळे त्यांचा देशाच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घेवून पदमुक्त करावे यामागणसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष शेख मोहीदोन साब,माजी नगरसेविका तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ.करूणा जमदाडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख लतीफ ,ॲड. प्रेसनजीत वाघमारे नांदेड शहर उपाध्यक्ष,ऊतम पाटील कदम, दिनेश भरकड,गिरीधर मैड,संजय कदम, एस.पी. कुभारे युसुफ मिया, प्रल्हाद गव्हाणे, प्रभू उरूडवाडे, शेख, नुरोदीन, के.जी.रावणगावकर, दीपक ठाकूर, शादुला पठाण, देविदास कदम, श्रेयश तायडे यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यी उपस्थिती होती.