Protest against amit shah ; वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध -NNL
नविन नांदेड। वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी आय नांदेड यांच्या वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 21 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी निषेध नोंदविला व पंतप्रधान यांच्या कडे निवेदनाद्वारे राजीनामा घेऊन पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.
भारत देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी दि. 17 डिसेंबर 24 रोजी दिल्ली येथील संसद भवनामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत "अभि एक फैशन हो गया है। आंबेडकर आंबेडकर आंबेडकर" इतक नाव देवाचे घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते असे विधान करुन देशातील शोषीत, वंचित, कष्टकरी, कामगार, स्त्री, मोलमजुर, युवक, जेष्ठ यांच्या भावना दुखावल्या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा हेतूपूर्वक प्...
