हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. विजयमाला कदम यांनी महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 2025 (मराठी विषय) यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.


याआधी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयातील सेट परीक्षेत देखील त्या यशस्वी ठरल्या होत्या. तसेच शिक्षक अभियोग्यता परीक्षा 2025 मध्येही त्यांनी राज्यपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्ता मगर यांनी अभिनंदन केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, हिंदी विभाग प्रमुख डॉ. शेख शहेनाज, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. प्रवीण सावंत, मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण पवार तसेच ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले उपस्थित होते.


संस्थेच्या अध्यक्षा सूर्यकांता ताई पाटील (मा. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री, भारत सरकार) व सचिव अरुण कुलकर्णी यांनीदेखील कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


