नांदेडकरियर

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

नांदेड| अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते माधव आटकोरे यांनी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथे वेळोवेळी प्रासंगिक अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून अवयव दान सप्ताहाच्या औचित्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी एक प्रेरणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव यांनी देहदान याविषयी सविस्तर माहिती दिली. माधव आटकोरे यांनी चालवलेली चळवळ दिशादर्शक असून मी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून देत आहे, अशी घोषणा करून विद्यार्थी पालकांना देहदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

63477458 6d28 4ffd 9293 4575fcb96617 Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो - माधव आटकोरे -NNL

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए. खदीर यांनी केले. तर आभार शैलजा बोरसे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, देहदान चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार माधव आटकोरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, दिनेश अमीलकंठवार, मारुती काकडे, पंचफुला नाईनवाड, चंद्रकला इदलगावे, सुनिता सोळंके, पद्माकर देशमुख कृष्णा बिरादार, संतोष देशमुख आदि शिक्षकांसह प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.विलास ढवळे यांनी विद्यार्थ्यांसाठी या तंत्रयुगात अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाबरोबर नवीन मार्ग धुंडाळावेत यासाठी जागतिक स्तरावर अनेक नोकऱ्यांची उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक बनले पाहिजे असे सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!