Wednesday, May 13

Tag: to work for others

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

नांदेड, करियर
नांदेड| अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते माधव आटकोरे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथे वेळोवेळी प्रासंगिक अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून अवयव दान सप्ताहाच्या औचित्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी एक प्रेरणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव यांनी देहदान याविषयी सविस्तर माहिती दिली. माधव आटकोरे यांनी चालवलेली चळवळ दिशादर्शक असून मी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून देत आहे, अशी घोषणा करून विद्यार्थी पालकांना देहदानाचे आवाहन ...
error: Content is protected !!