हिमायतनगर, अनिल मादसवार। आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत आज दिनांक 24 रोज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आला, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
विधानसभा निवडणूक -2024 अनुषंगाने हिमायतनगर शहरातुन काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आधीक्षक उप विभाग भोकर, बीएसएफचे 2 अधिकारी, हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक, 30 कर्मचारी, हिमायतनगर ठाण्याचे 01 पोलीस अधिकारी व 15 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या रूट मार्चमुळे हिमायतनगर शहर व तालुक्यात शांतता टिकून राहण्यास मदत होणार आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणूक शांततेत होण्यास मदत होणार आहे.