देगलूर,गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक छळ केल्याची घटना कोकलगाव येथे उघडकीस आली असून, मरखेल पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करून बिलोली न्यायालयासमोर आरोपीना हजर केले असता तीन दिवसाचे पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल किशन सूर्यवंशी वय २५ धंदा मंजुरी या तरुणाने गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दसरा व नवरात्र उत्सवाच्या काळात पासून शारीरिक छळ करून पिडीत मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या वडील यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस स्टेशन येथे जाऊन सुरेश सायदु सूर्यवंशी कोकलगांव यांनी फिर्याद दिली होती.

त्यावरून राहुल सूर्यवंशी रा.कोकलगाव याच्यावर मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपीला ताब्यात घेऊन बिलोली न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सा. पोलीस निरिक्षक रवि हुंडेकर हे करत आहेत.
