नांदेड| दैवशाला डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड या विद्यापीठाची भौतिकशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त केली आहे.


दैवशाला गंगाधरराव डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. एस.सी. कुभारखाने यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र या विषयात structural and dynamics behaviour of Nitriles through dielectric Properties Using a time Domain Reflectometry या विषयात संशोधन करून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. तो मान्य होऊन त्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली आहे. दैवशाला गंगाधरराव डोंगरे ह्या मुळच्या नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील हाळदा येथिल रहिवाशी आहेत.


त्यांचे प्राथमिक शिक्षण सिडको नांदेड येथील विद्या निकेतन शाळेत झाले. नेताजी सुभाषचंद्रबोस महाविद्याल्यातून त्यांनी आकरावी, बारावीचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको नांदेड येथून पुर्ण केले तर पदवीत्तर शिक्षण त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातून पुर्ण केले. त्यांचे अनेक शोध संशोधन पत्रिकेतून निबंध प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे शिक्षण व अध्यापन क्षेत्रात भरीव योगदान देत आहे.


त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याने त्यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. एस.सी. कुभारखाने, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम.के. पाटील, प्रा.डॉ. ए.व्ही. सरोदे, प्रा. आर.एच. माने, प्रा.डॉ. के.ए. बोगले, मा. उपकुलसचिव डॉ रवी सरोदे, डॉ नंदलाल लोकडे, रंजना डोंगरे, गंगाधर डोंगरे, विमल भद्रे, मिनाक्षी कदम, पी.पी. कदम, कपील कदम, सिध्दार्थ कदम, मिलिंद कदम, आनंद कदम आदी यांचे अभिनंदन केले आहे. विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



