PhD to Daivashala Dongre : दैवशाला डोंगरे यांना पीएचडी -NNL
नांदेड| दैवशाला डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड या विद्यापीठाची भौतिकशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त केली आहे.
दैवशाला गंगाधरराव डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. एस.सी. कुभारखाने यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र या विषयात structural and dynamics behaviour of Nitriles through dielectric Properties Using a time Domain Reflectometry या विषयात संशोधन करून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. तो मान्य होऊन त्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली आहे. दैवशाला गंगाधरराव डोंगरे ह्या मुळच्या नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील हाळदा येथिल रहिवाशी आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सिडको नांदेड येथील विद्या निकेतन शाळेत झाले. नेताजी सुभाषचंद...
