HomeनांदेडMission launched : धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास जावरला येथे प्रारंभ

Mission launched : धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास जावरला येथे प्रारंभ

नांदेड| किनवट तालुक्यातील जावरला येथे प्रधानमंत्री धरती आबा  जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे व इतर विभागाचे विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिराला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले.  

WhatsApp Image 2025 06 15 at 8.27.53 PM Mission launched : धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास जावरला येथे प्रारंभ

या शिबिरास जावरला परिसरातील आदिवासी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदिप नाईक, नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे, सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरसकोल्हे व इतर विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या ठिकाणी महसूल, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास, बांधकाम, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना एकाच ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments