क्राईमनांदेड

Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना महसूल विभागाशी हातमिळवणी करुन हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन सूरु आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे मा. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी. धनोडा येथे पैनगंगा नदि वरील पूल जोडण्याचे काम सूरू आहे ह्या करीता मोठ्या प्रमाणात मूरुमाची आवश्यकता आहे करीता शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड ह्यांनी महाखनीज प्रनालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीता अर्ज करून मौजे रूई,ता,माहूर येथील स.न./ ग.न. ५७ या मधील २.२० हे. आर क्षेत्रावर 300 ब्रास मूरुम, या गौण खानिज्याच्या उत्खनना करीता एकून रक्कम 206476.00 रु,भरून परवानगी घेतली.

व सहा ब्रासच्या सहा वहानाने व दोन टूटेन ने उत्खनन व वाहतूक सूरू केली, व सदर आदेशाची मुदत दि. 31-07-2025 ते दि. 05-08-2025 अथवा 300 ब्रॉस मूरुम, या गौण खनिजाच्या उत्खनन या पैकी जे अगोदर होईल त्यामुदती पर्यंत वैध राहील.असे आदेश तहसीलदार माहूर ह्याच्या सहिने देण्यात आले. मात्र प्रत्येक्षात घटनास्थळी परीस्थीती वेगळीच आहे रूई येथून ८ ते १० हायवाने वाहतूक सूरू असून दोन टूटेन मूरूम भरून देत आहेत व दिवस रात्र वाहतूक सूरू आहे, घटनास्थळी आठ ते दहा फूट खोली करण करण्यात आले असून हजारो ब्रॉस मूरुम उत्खनन करून नेण्यात आला आहे.

IMG 20250804 WA0013 Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास

संबंधित तलाठी/मंडळ अधिकारी यांनी संबंधित लिलावधारक यांना देण्यात आलेल्या बारकोडयुक्त पावती पुस्तकांचा वापर संबंधिताकडुन केला जात असल्याची वेळोवेळी तपासणी केली?. तसेच त्यांच्या वाहतुक परवान्याची महाखनिज मोबाईल ॲपवर वेळोवेळी तपासणी केली?, तसेच संबंधित लिलावधारक यांचेकडून कोणत्याही परिस्थीतीत अवैध उत्खनन होणार नाही याची दक्षता घेण्यात आली? याची सर्वस्वी जबावदारी कोनाची? मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!