Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना महसूल विभागाशी हातमिळवणी करुन हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन सूरु आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे मा. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी. धनोडा येथे पैनगंगा नदि वरील पूल जोडण्याचे काम सूरू आहे ह्या करीता मोठ्या प्रमाणात मूरुमाची आवश्यकता आहे करीता शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड ह्यांनी महाखनीज प्रनालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीता अर्ज करून मौजे रूई,ता,माहूर येथील स.न./ ग.न. ५७ या मधील २.२० हे. आर क्षेत्रावर 300 ब्रास मूरुम, या गौण खानिज्याच्या उत्खनना करीता एकून रक्कम 206476.00 रु,भरून परवानगी घेतली.
व सहा ब्रासच्या सहा वहानाने व दोन टूटेन ने उत्खनन व वाहतूक सूरू केली, व सदर आदेशाची मुदत दि. 31-07-2025 ते दि. 05-08-2...
