श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील बंजारा समाजातील 10 वी, 12वी, (75 टक्के गुण घेतलेले) जेइइ, नीट, एम पी एस सी, यू पी एस सी, नेट सेट परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभाचे रविवार दि. 14 जुलै रोजी माहूर शहरातील कपिल मंदिर (कपिल नगर ) येथे आयोजन गोर सेना माहूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य दल प्रमुख रतन राठोड, डॉ. मिनेश आडे (नायक ), अनिल चव्हाण, एस. एन. राठोड, अतुल नायक, गोर सेना जिल्हा सचिव अर्जुन पवार, समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष रवी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये गुणवंत विदर्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोर सेनेचे माहूर तालुकाध्यक्ष आशिष राठोड, सचिव प्रल्हाद राठोड, समनक जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद राठोड, आशिष आडे, वसंत राठोड यांनी केले आहे.