हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय (HUJPA College) हिमायतनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन दि 22 ते 25 जाने . 2025 दरम्यान संपन्न होणार आहे . त्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदावर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. डी. सी देशमुख व डॉ.एल.एस पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटकीय संबोधनामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांच्या उपस्थित आनंदीमय वातावरण निर्माण झाले.

आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ,त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा आणि चांगले विद्यार्थी महाविद्यालयातून घडावे असे मनोगतातून व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्टॉफ सेक्रेटरी डॉ.डि .के कदम व नॅक समन्वयक डॉ.गजानन दगडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण सावंत तर आभार प्रदर्शन प्रा.राजू बोंबल यांनी मानले.

22 जानेवारी रोजी 1.वकृत्व स्पर्धा, 2.वाद विवाद स्पर्धा, 3.रांगोळी स्पर्धा संपन्न, 23 जानेवारी रोजी 1.स्मरणशक्ती स्पर्धा, 2.गीत गायन, 3.धावणे स्पर्धा संपन्न होईल, दिनांक 22 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
