नांदेडआरोग्य

Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

हिमायतनगर| प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर (वाढोणा) द्वारा आयोजित नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना सप्ताहभर उपचार दिला जाणार आहे. या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे साप्ताहीक उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं.

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय जि. नांदेड येथे अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीर दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताहात दररोज सकाळी 9 ते दु.1 आणि दु.4 ते सायं. 8 वाजेच्या दरम्यान अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे कुमार (जोधपुर राजस्थान) मो. 7976498807 आणि जितेंद्र सिंह (जोधपुर राजस्थान) प्रमोद मो. 9782386341 हे उपचार करणार आहेत.

या साप्ताहीक शिबीरात खालील सर्व रोगांचे निदान औषध गोळया न घेता अॅक्युप्रेशर पध्दतीने केले उपचार केले जाईल. उदारहर्णार्थ लखवा मारने, गुडघे दुखी, पोटाचे विकार (गॅस, अॅसिडीटी, कब्ज), मान दुखी, वजन कमी करणे, पाठ दुखी, कंबर दुखी, लघवीचा त्रास, सांधे दुखी, अर्धे डोके दुखी फ्रोजन शोल्डर, मणक्यामध्ये नस दुखणे, स्लिप डिस्क, साईटिका थायरॉईड, हातापायात मुंग्या येणे बी.पी. (उच्च रक्तदाब), स्पोडिलोसिस, शुगर (मधुमेह) यावर उपचार व मार्गदर्शन केले जाईल. यासाठी रुग्णांना नाममात्र फिस रु. 200/- देऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर शिबिराचे आयोजन श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर च्या वतीने करण्यात आले आहे. तरी गरजु रुग्णांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button