नवीन नांदेड| शिव भक्तांसाठी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरात माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, शंकरराव हंबर्डे, जितेंद्र(बंडू )दायमा, सतीश भेंडेकर,शेषराव हंबर्डे यांच्या सहकार्याने पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेडचे संचालक सुझोक तज्ञ डॉ.संभाजी पवार ,डॉ.अवधुत पवार आणि त्यांच्या टीमने गुडघे दुखी, कंबर दुखी या आजारावर दि. 26ऑगस्ट 2024 रोजी श्रावण सोमवारी मोफत उपचार शिबिर आयोजित केले आहे.


आज प्रत्येक घरी गुडघे दुखी कंबर दुखी हा त्रास असलेले रुग्ण आहेत. पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड चे संचालक डॉ.संभाजी पवार या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत गेल्या आठ वर्षांपासून हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणून ते वेळोवेळी मोफत उपचार शिबिर आयोजित करतात. त्याचाच एक भाग म्हणून दि. 26 ऑगस्ट 2024 श्रावण सोमवारी काळेश्वर मंदिर येथे शिवभक्तासाठी गुडघे दुखी, कंबर दुखी या आजारावर एक दिवसीय मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सुजोक, अकुप्रेशर, कायरो, मसाज या थेरेपी द्वारे मोफत उपचार करण्यात येतील.


या शिबिरासाठी डॉ. अवधुत पवार, डॉ.संभाजी पवार यांच्या सोबत स. नरेंद्र सिंघ ग्रंथी, डॉ.प्रवीण जाधव,डॉ. वैभव देशमुख, काशिनंद पवार, बालाजी लिंबापुरे, सत्यव्रत पाटील, सूरज सूर्यवंशी,कुणाल लोखंडे,एकनाथ बागल,सतीश बागल, अल्केष भोसीकर,ऋषिकेश पांचाळ, साईनाथ पांचाळ यांचे मोलाचं योगदान असेल. तरी सर्व गरजू शिवभक्त रुग्णांनी या मोफत उपचार शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संभाजी पवार यांनी केले आहे.




