धार्मिकनांदेड

A grand kalasharohan ceremony : तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिनी होणार भव्य कलशारोहण समारंभ

नांदेड,हदगाव,हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिन म्हणजे वर्धापन दिनी मंदिराच्या भव्य कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक कार्यास सर्व लेकीबाळींनी आणि भाविक भक्तांनी उपस्थित होऊन शोभा वाढवावी असे आवाहन दासरी – माला दासरी समाज बांधव आणि तामसा गावकरी मंडळींनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.

तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंदिराचा कलशारोहन समारंभ संत महंताच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक ०२ रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास गुरुवर्य मंडळी उपस्थित राहणार असून, यात महंत श्री गोपाळागिर महाराज, दत्त बर्डी हदगाव, महंत श्री मृत्युंजय भारती महाराज, केदारगुडा, प.पु. श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, पिंपळगाव, महंत श्री प.पु. विरागीदास महाराज, शिवपुरी, श्री योगीराज गुरु बापू, हदगाव, श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव आदींसह अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत कलशारोहन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दि.01 मे 2025 गुरूवार रोजी ह.भ.प. श्री. सादुलवार गुरुजी,व्यसनमुक्ती प्रचारक (सेवा निवृत्त आदर्श शिक्षक) यांचे कीर्तन सायंकाळी 08 वाजता सुरु होणार आहे. सकाळी 08 वा श्रीकलश शोभायात्रा काढण्यात येणार असून, सकाळी 11.30 वाजता महाप्रसाद वितरण केला जाणार आहे. दिनांक 02 मे रोजी सकाळी 7 वाजता यज्ञयाग व कलशापुजा प्रधानाचार्य वेद मु.पं.श्री. नारायण शर्मा गुरुजी यांच्या वाणीत होईल. सकाळी 10 वाजता कलशारोहन का व कशासाठी या विषयावर भगवान महाराज रुईकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर 11 वाजता कलशारोह समारंभ संपन्न होईल. आणि ज्ञानसारस्वती संगीत संच शिवदरा यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि रतरी 08 वाजता हभप.भीमराव महाराज फुटाणकर यांच्या हरिकीर्तन होईल.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा) , आ. बाबुरावजी कदम कोहळीकर (हदगांव-हिमायतनगर), मा. खा. सुभाषरावजी वानखेडे (हिंगोली लोकसभा ) मा. आ. माधवराव पाटील जवळगांवकर (हदगाव हिमायतनगर), श्री. बालासाहेब कदम पा. (माजी समापती), श्री. लांडगे मामा आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंदराय पा. पंटलवार, श्री. रमेशअण्णा घंटलवार, श्री. बालाजीराव महाजन, श्री. दिलीप अण्णा बास्टेवाड, श्री. विजयकुमार लाभसेटवार, श्री. गोविंदराव पवार, श्री. निळू पाटील (भाजपा वि. अध्यक्ष), श्री. बाबुसराव कदम, रुईकर, श्री. संतोष निलावार, श्री. तातेराव पाटील (भाजपा ता.अध्यक्ष),ह.भ.प. पवार गुरूजी, अंबाळकर, श्री. सुभाषराव धरमुरे, श्री. रविशेठ बडेवार, श्री. गोविंदराव मेहेत्रे, श्री. अनंतराव भोपळे, श्री. शिवराज वारकड, श्री. शंकरराव वारकड, श्री. माधव नारेवाड, श्री. गोविंदराव जांभळेकर, श्री. सुशिभ मेहेत्रे, श्री. विवेक देशमुख (जिल्हा प्रमुख शिवसेना), ह.भ.प. बाबुराव महाराज, शिबदरकर, श्री. बाळू अप्पा गुंजकर, बाबूरावजी पवार पाथरडकर, श्री. राजुभाऊ फुलारे, श्री. सुभाष बास्टेवाड, श्री. किशोर पाटील (रूईकर) प्रमुख अतिथी म्हणून श्री. नानाराव दुघटवार, मा. रामप्रसाद मुंदडा, मा. पत्तेवार साहेब, मा.टिकोरे सर, या. गंधेवार साहेव, मा. मुधोळकर सर, नानाराव हरण पा, डॉ. संजय पचार, डॉ. निळे साहेब, मा. मुत्राभाऊ गङ्गाणी, अँड पवार साहेय, मा. पम्मेवार साहेब, मा. बालाप्रसाद मुंदडा, मा. श्रीनिवासभाऊ दमकोंडवार, अॅड. माने साहेच, नंदकुमार हनवते, चंतापुरे सर, वाय. के. कदम साहेब, मा. गजानन अनंतवार, बाबाराव कुंभकर्ण, शिवाजीराव चव्हाण, मा. संदिपराव शिंजे, डॉ. मामीडवार साहेब, मा. प्रविणकुमार वडकुते नाईक, मा. अवधुतराव पा, मा. भगवानराव कदम (रुईकर), श्रीमती निमडगे ताई पळसेकर, मा. दहिभाते (पत्रकार), मा. बंडू महाराज कवाना, पांडे माऊली (मानकरी) हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात विणेकरी ह.भ.प.श्री. व्यंकटराव चेपूरचार (माजी सरपंच कवाना) चोपदार श्री. विठ्ठलराव मोरे (तळणीकर) मृदंगाचार्य श्री. राजुभाऊ भडंगे (हिंगोली) हार्मोनियम वादक : प्रा. सचिन बोंपीलवार सर, तबलासम्राट ह.भ.प.श्री. कृष्णा महाराज कार्लेकर, (प्रसिध्द कीर्तनकार) गायणाचार्य: श्री. संतोष माऊली रूईकर, सोपान महाराज कुंडकर, बंडू महाराज आमदरीकर, सुनिल महाराज गुरफळी, बाबुराव चव्हाण, रामदास चक्षाण आदींचा सहभाग राहणार असून, शिबदरा टाळकरी : सर्वश्री गजानन दुर्गे, बबनराव दुराफे, दिलीपराव चव्हाण, भानुदास चव्हाण, पप्पू चव्हाण चिखली, शिवाजी तुपकरी, पांडूरंग दुर्गे, गोविंद आनेवार, कुबेर देशमुख, हदगांव टाळकरी: सर्वश्री तानाजी बर्वे, दिपक कदम, सागर शिंदे सर, विशाल पावडे, तुकाराम काळे, मारोतराव कदम, मारोती दुर्गेकर, प्रतापराव चव्हाण, माणिकराव मोरे, रामराव पवार, बालाजी देशमुख, बाळूअप्पा अर्धापुरे, विठ्ठलराव राजेगोरे, राम सुर्यवंशी, आयुष कदम आदी सहभागी होतील.

दि.11 मे 2025 रविवार रोजी श्री. नृसिंह जयंती दिना निमीत्य सकाळी 09 ते 11 वा अभंगवाणी कार्यक्रम संपन्न होणार असून, सादरकर्ते प्रा. सचिन बोपीलवार, नांदेड, (नादब्रम्ह संगीत विद्यालय, नादेड) श्री नृसिंह जन्मोत्सव किर्तन सोहळा सकाळी 11 वा किर्तनकार ह.भ.प. काशिनाथ महाराज माने, फुलकळसकर यांचे कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसादाने समारोप केला जाणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button