नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मुख्य ईदगाह मैदानावर नमाज पठण अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधव यांच्या बंदोबस्त साठी पोलीससह यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांनी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देगलूर नाका येथील मुख्य ईदगाह मैदानावर नांदेड दक्षिण व उत्तर परिसरातील व सिडको हडको भागातील मुस्लिम समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित राहुन नमाज पठण अदा करत असतात, यावेळी मोठ्या प्रमाणात होणारया गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार , अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरूव, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15अधिकारी,128 पोलीस अंमलदार,62, होमगार्ड, एस.आर.पी.एक तुकडी, दोन राखीव दल तुकड्या बंदोबस्त साठी ठेवण्यात आल्या होत्या.


यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे, विजयकुमार खटके, पांडुरंग हंबर्डे,,सिध्दु पुयड, गोविंद तेलंग,संतोष मोरे, लवकुश अवनुरे यांच्या सह अनेक पोलीस पाटील यांनी बंदोबस्त साठी मुख्य ईदगाह मैदानावर व मुख्य मार्गावर बंदोबस्त साठी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.



