लोहा| बेटी बचाव बेटी पढाव महिला शक्तीचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वीटभट्टी कामागर महिलांचा
दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोह्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वीटभट्टी महिला कामगारांचा साळी चोळी भेट सत्कार करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे संयोजक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष केशव पाटील पवार, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,डी.एन. कांबळे, सुरेश महाबळे, तालुकाध्यक्ष विशाल घंटे, प्रविण महाबळे, विश्वनाथ महाबळे , पप्पू पाटील बोडके, बजरंग यादव चव्हाण आदी उपस्थित होते.

म.रा. पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष केशव पाटील पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असतात तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या पत्रानुसार व आदेशानुसार दि. ८ मार्च महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नमन स्त्रीशक्तीला हे घोषवाक्य घेऊन महिलांचा सन्मान करावे यानुसार लोहयात दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यक्ष वीटभट्टीच्या कामावर जाऊन वीटभट्टी महिला कामगारांचा साळी चोळी भेट देऊन सत्कार केरण्यात आला.
