हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील सर्व मित्रमंडळींनी दिपावली सनाच्या निमित्ताने एकत्र येऊन गेट टुगेदर करून क्रिकेट मित्र खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत २० वर्षापूर्वी खेळणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांच्या आवाहनाला सर्वानी प्रतिसाद देत मैदानाची झालेली दुरावस्था दूर करत साफ सफाई करून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे.
लहानपणीच्या आठवणीने सर्व मित्रांनी एकत्र येऊन दिवाळीत हा उपक्रम राबवित खेळण्याचा आनंद घेतला आहे. आजच्या स्थितीत प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला आहे, मोबाईल वरील इंस्टाग्राम, फेसबुक, वाट्सअप व इतरत्र वाईट व्यसनात अडकलेला आहे. त्यामुळे सर्वाना खेळाचा विसर पडला असून, जे तरून वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना खरबा वरील क्रिकेट मित्र गेट-टुगेदर ही संकल्पना आत्मसात करून प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक तरुण वाईट मार्गापासून दुर राहिला पाहिजे, शरीर स्वास्थाकडे लक्ष दिले पाहिजे, शरीर तंदुरुस्त राहिले पाहिजे, चांगल्या सवयी आत्मसात करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. जीवन निरोगी राहून चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे, अशा अनेक चांगल्या सवयी प्रत्येक तरुणांनी जोपासल्या पाहिजे. असा संदेश डॉ.किरण करेवाड यांनी दिवाळीच्या सनाच्या निमित्ताने दिला आहे. तसेच सिरंजनी गावचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून सर्व कनिष्ठ, वरिष्ठ मित्रांच्या सहकार्याने नविन पिढीला चांगला मॅसेज देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.
यात मित्र घोडके सर ,वाठोरे सर, लक्ष्मण दादा, आडेलु सुंकुरवाड, माधव कागळे, माझे बॅचमेन्ट डॉ किरण व नितीन ऊर्फ गोलू, सरपंच पवन करेवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून मागील पिढीला चांगला संदेश, चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आम्ही इतर सर्वच मित्रांनी यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केल आहे. तसेच उपस्थित सर्व मित्रांनी याच मैदानावर दिवाळी फराळाचे स्वाद घेऊन एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सिरंजनी येथील हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रम राबवली जातात. 8 एप्रिल 2023 मध्ये माझे वडील कै. किशन वासुदेव यांच्या स्मरणार्थ भव्य असा जंगी कुस्त्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. या माध्यमातून बलोपासनेपासून दुरावणाऱ्या बऱ्याच तरुणावर चांगला परिणाम पडलेला आहे. आता गावामध्ये बरेच कुस्त्याचे आखाडे चालत आहेत. बरेच तरुण व्यसनापासून मुक्त झाले असून, त्यांना कुस्त्याचा नाद लागलेला आहे. त्याचबरोबर आपलं गाव स्वच्छ निर्मळ सुंदर राहण्यासाठी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. त्याचबरोबर जुलै 2022 मध्ये तालुक्यातील बारा गावामधील शाळेमध्ये बाल उजळणी पुस्तकांचे वाटप सुद्धा केलेले आहे. अशा प्रकारे अनेक उपक्रम समाजाच्या सेवेसाठी निस्वार्थपणे राबवले जातात अशी माहिती रामेश्वर किशन वासुदेव यांनी दिली आहे.