old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील सर्व मित्रमंडळींनी दिपावली सनाच्या निमित्ताने एकत्र येऊन गेट टुगेदर करून क्रिकेट मित्र खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत २० वर्षापूर्वी खेळणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांच्या आवाहनाला सर्वानी प्रतिसाद देत मैदानाची झालेली दुरावस्था दूर करत साफ सफाई करून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे.
लहानपणीच्या आठवणीने सर्व मित्रांनी एकत्र येऊन दिवाळीत हा उपक्रम राबवित खेळण्याचा आनंद घेतला आहे. आजच्या स्थितीत प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला आहे, मोबाईल वरील इंस्टाग्राम, फेसबुक, वाट्सअप व इतरत्र वाईट व्यसनात अडकलेला आहे. त्यामुळे सर्वाना खेळाचा विसर पडला असून, जे तरून वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना खरबा वरील क्रिकेट मित्र गेट-टुगेदर ही संकल्पना आत्म...
