बिलोली,गंगाधर मठवाले| शहापूर-बिलोली तालुक्यातील खतगाव येथून मुरुमाने भरलेला टिपर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज चुकल्याने नदीच्या पाण्यात वाहून गेला. सुदैवाने वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे छोट्या नद्यांना पूर आला आहे. तरीसुद्धा मुरुम वाहतुकीसाठी टिपर चालवल्याने जनतेत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. “वाहनचालक जीव मुठीत घेऊन गाडी चालवतोय का?” असा सवाल परिसरात चर्चेत आहे.




