लोहा/पुणे│ लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पुणे येथे लोहा–कंधार तालुक्यातील भूमिपुत्र, स्नेहीवर्ग व मित्रपरिवार यांनी उत्स्फूर्त स्वागत व जंगी सत्कार केला. शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या शरद पवार यांनी प्रबळ आर्थिक पाठबळ असलेल्या प्रतिस्पर्धी गजानन सूर्यवंशी यांचा दारूण पराभव करून विजय मिळवला आहे.


या दौऱ्यात नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यासोबत नगरसेवक करीम शेख, भास्कर पवार, कंधार नगरपंचायत उमेदवार स्वप्नील लुंगारे, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, जफरउल्लाखान, तसेच कंधार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर भोसीकर यांचा समावेश होता.

प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करताना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा उल्लेख केला आणि आमदार प्रशांत चिखलीकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.


भूमिपुत्रांकडून घरी घेऊन जंगी सत्कार
पुण्यात वास्तव्यास असलेल्या लोहा–कंधार तालुक्यातील कार्यरत उद्योजक व व्यावसायिकांनी शरद पवार यांना घरी नेऊन मानाचा सत्कार केला. नगरसेवक करीम शेख व भास्कर पवार यांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. आपल्या मातृगावातील स्नेही नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्याचा पुणेतील भूमिपुत्रांना अभिमान व आनंद व्यक्त झाला. हे या सत्कार सोहळ्यांतून प्रकर्षाने जाणवले.

घोज (ता. कंधार) चे उद्योजक सुलतान शेठ बेग यांच्याकडून भव्य सन्मान
घोज येथील भूमिपुत्र व पुण्यातील यशस्वी उद्योजक सुलतान शेठ बेग यांनी आपल्या संस्थेतील सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक करीम भाई व भास्कर पाटील पवार यांचा विशेष सत्कार केला.

हिंजवडी ग्रामपंचायतीत मानाचा सन्मान — विकासकामांवर चर्चा
पुणे आधुनिक सुविधांनी सज्ज व अनुकरणीय प्रशासनासाठी ओळखली जाणारी हिंजवडी ग्रामपंचायत येथेही नगराध्यक्ष शरद पाटील पवार व नगरसेवक मंडळाचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच गणेश जांभूळकर, उपसरपंच विशाल साखरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी शहरी विकास, स्वच्छता व्यवस्थापन, आधुनिक ग्रामरचना, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नगरसेवक भास्कर पाटील, करीम शेख, माधव पवार, सद्दाम शेख, राजेश चव्हाण, तिरुपती वाकडे यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

