क्राईमनांदेड

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व साठवणुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत रेती माफियांना जोरदार धक्का दिला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर छापा टाकत एकूण ५४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भंनगी, वाहेगाव व पिंपळगाव (निमजी) शिवारातील गोदावरी नदीपात्रात इंजिन व तराफ्याच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करून साठवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकला असता, चार आरोपी पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

IMG 20260206 WA0052 Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

छाप्यादरम्यान नदीपात्रातून रेती उपशासाठी वापरण्यात येणारे तराफे व इंजिन पंचांसमक्ष जाळून नष्ट करण्यात आले, तसेच नदीकिनारी साठवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रेती जप्त करून खाजगी वाहनाद्वारे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ४५ ब्रास रेती (किंमत सुमारे २ लाख २५ हजार रुपये), ४ इंजिन (किंमत १२ लाख रुपये) व इतर साहित्य असा एकूण ५४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

IMG 20260206 WA0044 Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारोती पंचलिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. अवैध रेती व्यवसायाविरोधात भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!