नांदेड। जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड टीम नांदेड तर्फे 26 जाने रोजी सायंकाळी तिळगुळ स्नेहा मिलन व हळदीकुंकू समारंभ महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संस्कार इंग्लिश प्ले स्कूल,जिजाऊ होस्टेलच्या बाजूला,गीता नगर,नांदेड या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन एकलपालक असलेल्या महिलांच्या हस्ते करून त्यांना सन्मानित करून एक चांगलं उदाहरण समाजासमोर दाखल केले.

कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली, यावेळी महिलांना हळदीकुंकू लावून, तिळगुळ देऊन विविध महानायकांची चरित्र पुस्तके वाण म्हणून भेट दिले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविधतेत एकता दाखवणारी वेगवेगळ्या राज्यांची जिजाऊ ब्रिगेड महिलांनी केलेली वेशभूषा. या कार्यक्रमाला राजकीय,प्रशासकीय, व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांपासून तर सर्वसामान्य महिलांपर्यंत हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिजाऊ ब्रिगेड टीम सुमित्रा वडजकर(जिल्हाध्यक्ष द) व कल्पना चव्हाण (जिल्हाध्यक्ष उ)

डॉ.भारती मढवई, डॉ विद्या पाटील,अरुणा जाधव, मीनाक्षी पाटील,वनिता देवसरकर,अर्चना होगे, रत्नमाला जाधव,सोनाली देशमुख,सुनिता कल्याणकर,रेणुका कौसले,सुनिता बोंगाणे,सुरेखा रावणगावकर,राणी दळवी,कविता आगलावे,संतोषी पाटील,प्रिया इंगळे,अनुराधा खरगे,कीर्ती सुस्तरवार, निर्मला जाधव,शिवानी जाधव,शुभलक्ष्मी सूर्यवंशी, श्रद्धा कदम प्रज्ञा देशमुख यांनी केले.
