नांदेडस्पोर्ट्स

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

नांदेड| चीन येथील टाईपाई येथे होणा-या दुसरी एशियन युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धा -२०२४ साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील खेळाडू तेजबीरसिंघ जहागीरदार यांची निवड झाली आहे.

ही स्पर्धा दि. ३० ऑगष्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान चिन येथील टाईपाई येथे संपन्न होणार आहे. कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर येथे दि. १२ ते १४ जुलै दरम्यान निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यापीठातर्फे तेजबीरसिंघ जागीरदार याने सहभाग घेतला होता. त्यात तेजबीरसिंघ जहागीरदार यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडी बाबतचे पत्र कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर यांनी विद्यापीठास दिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी तेजबीरसिंघ जहागीरदार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी महमद शकील, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. सिंकू कुमार सिंह, डॉ. नारायण चैधरी, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. संतराम मुढे, हनुमंत कंधारकर, प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव यांच्यासह चरणकमलजितसिंघ जहागीरदार, रोशनसिंघ जहागीरदार, पप्पू देशमुख व क्रीडा विभागातील संजयसिंह ठाकूर, के. एम. हसन, शिवाजी हंबर्डे, सुनिल लुटे, रतनसिंघ पुजारी आदीनी शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button