नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंद बाबाराव मोरे यांची उपाध्यक्षपदी अशोकराव रावणगांवकर तर मानद सचिव पदी जमील अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी पत संस्थेच्या सन 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी निवडणुक झाली होती व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी ही पार पडली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सोळके पुरस्कृत बैंक कर्मचारी विकास पॅनलचे सर्वच 13 उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडुन आले.
दरम्यानचे कालावधीत 15 मार्च पासून लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहित चालू झाल्याने कर्मचारी पत संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु सहकार निवडणुक प्राधिकरण यांच्या ओदशाप्रमाणे 10 जून पासून आचार संहिता शिथील झालेली असल्याने मा. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकाच्या नावे जाहीर करत अधिसुचना काढली.
निवडुन आलेल्या संचालकातून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी एस.पी. डावरे यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. एस.पी. डावरे यांनी सभेच्या नोटीस काढून दि. 22 जून संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव या पदाची निवड करण्यासाठी बैठक बोलवली सदरच्या बैठकीत पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी आनंदराव मोरे, उपाध्यक्ष अशोक रावणगांवकर यांची तर मानद सचिव पदी जमील अहेमद यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
बैठकीस संचालक संभाजी जाधव, दत्तु वानखेडे, घनश्याम कदम, किशोर देशमुख, धोंडीबा कदम, मधुकर शिंदे, बालाजी हिंगोले, उमाकांत पाटील, ग्यानु खोडके, हणमंत दोसलवार, सौ. नागमनी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती शहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव चे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिले.