नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL
नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंद बाबाराव मोरे यांची उपाध्यक्षपदी अशोकराव रावणगांवकर तर मानद सचिव पदी जमील अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी पत संस्थेच्या सन 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी निवडणुक झाली होती व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी ही पार पडली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सोळके पुरस्कृत बैंक कर्मचारी विकास पॅनलचे सर्वच 13 उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडुन आले.
दरम्यानचे कालावधीत 15 मार्च पासून लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहित चालू झाल्याने कर्मचारी पत संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु सहकार निवडणुक प्राधिकरण यांच्या ओदशाप्रमाणे 10 जून पासून आचार संहिता शिथील झालेली असल्या...
