fish market : नांदेड जिल्ह्यात मासळी मार्केट व लँडिंग सेंटर्स उभारण्याची मागणी

नांदेड| प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आधुनिक एकीकृत मासळी लँडिंग सेंटर्स तसेच मासळी मार्केट उभारण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धविकास व पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्याकडे केली आहे.

भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष अॅड. चंद्रसेन पाटील यांनी नुकतीच खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने अनेक मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खा. चव्हाण यांनी आज राजीव रंजन सिंग यांच्या संसद भवनातील कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सुधा नदी परिसर, लोहा तालुक्यातील माळेगाव येथील मन्याड नदी परिसर तसेच नांदेड येथील गोदावरी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होते. परंतु, या ठिकाणी मासळी लँडिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे या तीनही ठिकाणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आधुनिक एकीकृत मासळी लँडिंग सेंटर उभारण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी याप्रसंगी केली.

त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील भोकर, लोहा तालुक्यातील गोंदगाव आणि नांदेड शहरात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत आधुनिक व स्वच्छ मासळी मार्केट मंजूर करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. या भागातील जलाशयांमध्ये लक्षणीय मत्स्य उत्पादन होते. परंतु आधुनिक, स्वच्छ व सुसज्ज मासळी मार्केटच्या अभावामुळे मच्छीमारांना अपेक्षित आर्थिक आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी मार्केट उभारण्यास मंजुरी द्यावी, अशीही मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्याकडे केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button