fish market : नांदेड जिल्ह्यात मासळी मार्केट व लँडिंग सेंटर्स उभारण्याची मागणी
नांदेड| प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आधुनिक एकीकृत मासळी लँडिंग सेंटर्स तसेच मासळी मार्केट उभारण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धविकास व पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्याकडे केली आहे.
भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष अॅड. चंद्रसेन पाटील यांनी नुकतीच खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने अनेक मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खा. चव्हाण यांनी आज राजीव रंजन सिंग यांच्या संसद भवनातील कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सुधा नदी परिसर, लोहा तालुक्यातील माळेगाव येथील मन्याड नदी परिसर तसेच नांदेड येथील गोदावरी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होते. परंतु, या ठिकाणी मासळी लँडिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामु...
