हिमायतनगर। येथील पंचायत समिती कार्यालयात मनरेगा विभागात तांत्रिक अभियंता गेल्या सोळा वर्षांपासून तळ ठोकून बसला असुन, माहूर येथे बदली झाल्यानंतर सहा महिन्यांत परत हिमायतनगर पं.स.ला तांत्रिक अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. सदरील तांत्रिक अभियंता यांनी एकाच ठिकाणी राहण्यासाठी नरेगा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले असून, हिमायतनगर पंचायत समितीत तळ ठोकून रहाण्याचे गुड काही वेगळेच असल्याची चर्चा रंगू लागली आहे आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष देण्याची मागणी कामानिमित्त या कार्यालयात चकरा मारणाऱ्या लाभार्थी मधून केली जाते आहे.
प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एका ठिकाणी तिन वर्षाचा कालावधी असतो. याचं पंचायत समिती कार्यालयातील अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे वास्तव आहे. परंतु हिमायतनगर येथील पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागात गेल्या सोळा वर्षांपासून एक तांत्रिक अभियंता ठाण मांडून बसला असुन, त्यांच्यावर कुणाची मेहरबानी आहे…? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्या अभियंत्यानी ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी करीता हजारो रुपये घेऊन कामे अर्धवट ठेवले असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. माहुर पं.स.ला बदली झाल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांत हिमायतनगर पं.स.ला रूजू होऊन पून्हा तिच पुनरावृत्ती सुरू केली आहे .नरेगा योजनेच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची लूट केल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
हिमायतनगर तालुक्याचे भुमिपूत्र असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मनरेगाच्या कामांना गती मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन विहीर, फळबाग,जनावराचा गोठा, शेततळे या मनरेगाच्या योजना पोहोचल्या आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर सुरू आहेत तर काही पुर्णपणे झाली आहेत.
सदरील तांत्रिक अभियंता हा मनरेगा विभागात चांगली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील कामात अडथळे निर्माण करून माझ्या गावात फिरकू नका असा दम देत आहे. माझे मनरेगाच्या जिल्हा वरिष्ठांपर्यंत लागेबांधे असुन, मी तालुक्यात दहा वर्षांपासून आहे. त्यामुळे मी म्हणेल तिच कामे करा असा दमही देत आहेत. त्यामुळे मनरेगा विभागात या अभियंत्यानी बाबत वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी मनरेगाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरील तांत्रिक अभियंत्यांची चौकशी करावी किती वर्षांपासून येथे कार्यरत आहेत, पुन्हा यांच ठिकाणी का रुजू झाले आहेत. हिमायतनगर पंचायत समिती का..? सुटेना याबाबत योग्य चौकशी केल्यास त्यांच्या हातून झालेल्या अनेक नियमबाह्य कामाचे मोठे घबाड हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
तसेच हिमायतनगर पंचायत समिती येथे दहा वर्षांपासून कार्यरत असलेले एल.जी. गाडे तांत्रिक सहाय्यक मनरेगायो कक्ष यांची तक्रार सिद्धार्थ विठ्ठलराव तलवारे स्थापक कार्यध्यक्ष अन्याय प्रतिकार दल महाराष्ट्र राज्य यानी तक्रार केली असून, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत दरेगाव, टाकराळा, टेभी, मंगरुळ, पारवा बु. पारवा खु. पोटा (बु) (खु) वाई, टेभूर्णी, वाधी, किरमगाव, शिबदरा, खैरगाव ता., या ठिकाणी सिंचन विहीर, शेततळे, जनावराचा गोठा, सुरक्षा भिंत. सी.सी. रस्ते व फेव्हर ब्लाक, पांदन रस्ते फळबाग शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लावगड करणे अशी कामे चालू केली आहेत. हि कामें नीकृष्ट व बोगस होत आहेत. तांत्रिक सहाय्यक एल.जी. गाडे हे मनमानी कारभार करून शासनाच्या योजनेचा बट्याबोळ करत असल्याने एल.जी. गाडे यांच्यावर योग्य ती कार्यवाही अन्यथा नांदेड जि.प. कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असे तक्रारीत नमूद केले, या संदर्भानव्ये तीन दिवसात सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व उपोषणकर्त्यास उपोषणापासून परावूर्त करावे असे आदेश गटविकास अधिकारी हिमायतनगर यांनी दिले आहेत. आता मनरेगा मध्ये गेल्या 16 वर्षांपासून तांत्रिक अभियंता म्हणून काम पाहणारे वाघमारे यांचाही मनमानी प्रताप उघड होऊ लागल्याने त्याच्यावर गटविकास अधिकारी कोणती कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.