मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL
हिमायतनगर। येथील पंचायत समिती कार्यालयात मनरेगा विभागात तांत्रिक अभियंता गेल्या सोळा वर्षांपासून तळ ठोकून बसला असुन, माहूर येथे बदली झाल्यानंतर सहा महिन्यांत परत हिमायतनगर पं.स.ला तांत्रिक अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. सदरील तांत्रिक अभियंता यांनी एकाच ठिकाणी राहण्यासाठी नरेगा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले असून, हिमायतनगर पंचायत समितीत तळ ठोकून रहाण्याचे गुड काही वेगळेच असल्याची चर्चा रंगू लागली आहे आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष देण्याची मागणी कामानिमित्त या कार्यालयात चकरा मारणाऱ्या लाभार्थी मधून केली जाते आहे.
प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एका ठिकाणी तिन वर्षाचा कालावधी असतो. याचं पंचायत समिती कार्यालयातील अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे वास्तव आहे. परंतु हिमायतनगर येथील पंचायत समितीच्...
