नांदेडलाइफस्टाइल

Poet Prashant More : व्हावी तुझ्या नावानं नव्या युगाची पहाट.. कवी प्रशांत मोरे यांच्या आईंच्या कवितांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध

लोहा| तू जगाचा पोशिंदा.. कशाला मरावं गड्या या शेतकरी आत्महत्यावर भाष्य करत खूप सोसले तू आई
मिळो मला नवी वाट…व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाचीच पहाट ,..या काव्यातून आईचे श्रेष्ठत्व अधोरेखित करत मुंबई येथील प्रसिद्ध गीतकार कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या कविता सादर करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मातोश्री मुक्ताई धोंडगे याच्या कार्याचा काव्यातून त्यांनी गौरव केला.

लोहा येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात मातोश्री मुक्ताई याच्या स्मृतीदिन मुंबई येथील प्रसिद्ध कवी गीतकार प्रशांत मोरे यांच्या उपस्थितीत लोहा शहरातील तुळजाई मंगल कार्यालयात, कार्यक्रम पार पडला गीतकार प्रशांत माेरे यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कवितांनी माताेश्री मुक्ताई धोंडगे यांचा स्मृतिदिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकाप कार्यकर्ते रणधीरसिंह गहेरवार होते तर माजी जि.प सदस्या प्रा.डाॅ. साै.संध्याताई धोंडगे, प्रा.डाॅ.साै. मनीषाताई धोंडगे, सौ जयक्रांती गवते, साै.मनकर्णीका जाधव, हभप माधव महाराज गीते, साहित्यिक प्रा. महेश मोरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते, महाविद्यालयाचे अध्यक्ष व्ही.जी.चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक डी.एस बोधगिरे, मुख्याध्यापक सूर्यकांत लुंगारे हे उपस्थित होते.

प्रसिद्ध गीतकार प्रशांत मोरे यांनी मार्गदर्शन करताना ‘ मला शाळेत पाठवायची माय’, ‘बाप नारळ खोबरं, माय नारळातलं पाणी’ तू जगाचा पोशिंदा ..कशाला मरावं गड्या या शेतकरी आत्महत्यावर भाष्य करणाऱ्या आणि खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट…व्हावी तुझ्याच नावान.. नव्या युगाचीच पहाट ,.. या आईचे श्रेष्ठत्व विशद करणाऱ्या प्रख्यात कवी, मराठी चित्रपट गीतकार प्रशांत मोरे यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या, तसेच श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर केल्या.

श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी, मातोश्री मुक्ताई धोंडगे यांनी मन्याड खोऱ्यातील मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी भाई केशवराव धोंडगे यांना प्रेरणा दिली. याबरोबरच तत्कालीन समाजातील अनेक अनिष्ट प्रथा परंपरांना पायदळी तुडविल्या वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना भाकरी घातल्या, नाही रे वाल्यांना जगण्याचे बळ दिले. म्हणून अशा मातोश्रींच्या कर्तुत्वाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा नव्या पिढीला कळाला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असे प्रास्ताविकात सांगितले.

याच कार्यक्रमात मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या जीवन व कार्यावर आधारित प्रा.महेश मोरे द्वारा लिखित व डॉ. शोभा शिंदे द्वारा इंग्रजी अनुवादित ‘मुक्ताई’ या किशोर कादंबरी चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री व्ही.जी. चव्हाण यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या जीवन व कार्यावर भाष्य केले प्रा.महेश मोरे यांनी ‘मुक्ताई’ या किशोर कादंबरी च्या निर्मितीची प्रक्रिया, त्याचबरोबर मुलांसाठी या कादंबरीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.जयराम सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ.नानासाहेब सूर्यवंशी यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!