Poet Prashant More : व्हावी तुझ्या नावानं नव्या युगाची पहाट.. कवी प्रशांत मोरे यांच्या आईंच्या कवितांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध
लोहा| तू जगाचा पोशिंदा.. कशाला मरावं गड्या या शेतकरी आत्महत्यावर भाष्य करत खूप सोसले तू आई
मिळो मला नवी वाट...व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाचीच पहाट ,..या काव्यातून आईचे श्रेष्ठत्व अधोरेखित करत मुंबई येथील प्रसिद्ध गीतकार कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या कविता सादर करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मातोश्री मुक्ताई धोंडगे याच्या कार्याचा काव्यातून त्यांनी गौरव केला.
लोहा येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात मातोश्री मुक्ताई याच्या स्मृतीदिन मुंबई येथील प्रसिद्ध कवी गीतकार प्रशांत मोरे यांच्या उपस्थितीत लोहा शहरातील तुळजाई मंगल कार्यालयात, कार्यक्रम पार पडला गीतकार प्रशांत माेरे यांच्या मंत्रमुग्ध करणार्या कवितांनी माताेश्री मुक्ताई धोंडगे यांचा स्मृतिदिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकाप कार्यकर्ते रणधीरसिंह गहेरवार होते ...
